img-20160906-wa0035

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हा आरती संग्रह राष्ट्रार्पण –

|| आरती पंतप्रधानांची ||
सुख हरता दुःख देता वार्ता गुजरातची,
देश विदेशी भ्रमणे इच्छा जयाची|
आत्मविश्वासे फेके छाती छप्पन इंची,
करतो मन की बात ऐकतो ना कोणाची|

जय देव जय देव जय नामो देवा,
अच्छे दिन तुमचे तुमच्या कडेच ठेवा,
जय देव जय देव …

|| आरती मुख्यमंत्र्यांची ||
आरती केजरीवाला, बहुमते सीएम झाला,
ट्वीटरवर राज करी, आप-ली दिल्ली विसरला,
आरती केजरीवाला|

मुखी ठेवी नाम मोदी, करी सम विषम,
गेले मंत्री एकामागे एक, करे काही ना काम,
आरती केजरीवाला|

|| प्रार्थना विरोधी पक्षनेत्याची ||
घालीन शपथ आज्जी वडिलांची, राहुलला स्वतःचे कर्तृत्व नाही,
गरीबी हटवून जावई श्रीमंत, गरीबाच्या झोपडीत दरवर्षी जाई |

हरे शरद, हरे लालू, मायावती हरे हरे,
हरे नितीश, हरे अखिलेश, उद्धव-राज हरे हरे |

मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ||

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s